राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा शॉक

महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. कारण प्रति युनिट विजेच्या दरात एक रुपया चार पैशांची वाढ करण्यात आली आहे.

Updated: Jul 11, 2015, 09:35 PM IST
राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा शॉक  title=

मुंबई : महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. कारण प्रति युनिट विजेच्या दरात एक रुपया चार पैशांची वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारनंच ही घोषणा केली आहे. या आधी २७ जून रोजी उद्योग व्यवसायांसाठीची वीज वगळता, सामान्य ग्राहक तसंच इतरांसाठीच्या वीज दरात वाढ केली गेली होती. त्यानंतर आता पुन्हा अॅडिशनल सेस टॅक्सच्या रुपात ही दरवाढ करण्याची घोषणा शुक्रवारी राज्य सरकारनं केली आहे. 

परळी वीज प्रकल्पाला नांदेडचे पाणी
दरम्यान, परळीच्या वीज प्रकल्पासाठी नांदेडहून पाणी आणण्याचा घाट आता राज्य सरकार घालणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी परळीमध्ये आणलं जाणार असल्याचं ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी नागपूरमध्ये सांगितलंय.

कॅनॉलच्या माध्यमातून हे पाणी आणलं जाणार आहे. पावसानं ओढ दिल्यामुळे पाण्याआभावी परळीच्या वीजनिर्मिती केंद्रातले सर्व संच बंद पडलेत. याबाबत छेडलं असता त्यांनी ही माहिती दिली.

ऊर्जामंत्र्यांनी ही घोषणा केली खरी, मात्र नांदेडहून परळीला पाणी आणण्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.