दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला केंद्राकडून मदत नाही

महाराष्ट्रातील अनेक गावे दुष्काळाने होरपळतायेत. दुष्काळामुळे राज्यातील बळीराजा आत्महत्या करतोय मात्र असे असूनही केंद्राकडून मदतीचा एकही पैसा आलेला नसल्याची माहिती राज्य सरकारनंच सुप्रीम कोर्टात दिलीय. 

Updated: Feb 1, 2016, 02:03 PM IST
 दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला केंद्राकडून मदत नाही title=

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक गावे दुष्काळाने होरपळतायेत. दुष्काळामुळे राज्यातील बळीराजा आत्महत्या करतोय मात्र असे असूनही केंद्राकडून मदतीचा एकही पैसा आलेला नसल्याची माहिती राज्य सरकारनंच सुप्रीम कोर्टात दिलीय. 

दुष्काळ निधीसंदर्भात एका जनहित याचिकेच्या नोटिशीवर राज्य सरकारनं ही माहिती कोर्टात दिलीय. राज्यातल्या २१ जिल्ह्यांमधील १५ हजार ७४७ गावे दुष्काळानं होरपळतायत. मात्र अद्यापही केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोणत्याही प्रकारची मदत आलेली नाही. 

केंद्रात तसेच राज्यात भाजपचे सरकार आहे. मात्र असे असूनही राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं मोदी सरकारला हे शक्य झालेलं नाही