राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह

आज एक मे. भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज ५८वा वर्धापन दिन आहे. या निमित्तानं राज्यभरात विविध शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

Updated: May 1, 2017, 07:58 AM IST
राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह title=

मुंबई : आज एक मे. भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज ५८वा वर्धापन दिन आहे. या निमित्तानं राज्यभरात विविध शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे ध्वजवंदन आणि संचलन कार्यक्रम असणार आहे. तसंच जिल्ह्यांमध्येही विविध ठिकाणी सकारी कार्यक्रम असणार आहेत. महाराष्ट्र दिन निमित्तानं राज्याच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकासात योगदान देणा-या युवा पिढीशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. 

राज्याच्या विकासाबाबत युवकांना जाणून घेता यावं यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम साकारण्यात आलाय. मुंबईतल्या वरळीमधल्या एनएससीआय इथे हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातले जवळपास 8 हजार युवक सहभागी होणार आहेत. 

यात हे तरुण ट्रान्सफॉर्म महाराष्ट्राबाबतच्या आपल्या संकल्पना सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा, मेजर जनरल अनुज माथुर, अभिनेता अक्षय कुमार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.