महा बजेट : काय स्वस्त, काय महाग?

राज्याचे बजेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केले. महिला वर्गाल खूश करण्यासाठी वेतनावरील कराची सवलत दिली आहे. तसेच काय स्वस्त आणि काय महाग याकडे लक्ष लागले होते. याचबरोबर एलबीटी रद्द करण्याचे जाहीर केल्याने काही प्रमाणात अनेक वस्तू वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Updated: Mar 18, 2015, 04:18 PM IST
महा बजेट : काय स्वस्त, काय महाग? title=
अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्य मंत्री दीपक केसरकर

मुंबई : राज्याचे बजेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केले. महिला वर्गाल खूश करण्यासाठी वेतनावरील कराची सवलत दिली आहे. तसेच काय स्वस्त आणि काय महाग याकडे लक्ष लागले होते. याचबरोबर एलबीटी रद्द करण्याचे जाहीर केल्याने काही प्रमाणात अनेक वस्तू वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महिला नोकरदारांच्या १० हजार रूपयांपर्यंतच्या मूळ वेतनावर व्यवसाय कर आता असणार नाही. तसेच १ ऑगस्टपासून एलबीटी रद्द होणार आहे. त्यामुळे जकात कर रद्द होण्याची मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे वस्तूंवर गोळा केला जाणार जकात कमी होऊन अनेक वस्तू स्वस्त होतील.

यामध्ये विदेशी फर्निचर, तंबाखू, सायकड, लाकडू, अवजड वहाने, विदेशी फर्निचर, तंबाखू, मद्य, अवजड वाहने, लाकूड व त्यापासून बनविलेल्या वस्तू, इमारत व बांधकाम साहित्य, हत्यारे व दारूगोळा, छायाचित्रण, सिनेमासाठी लागणारे साहित्य, इलेक्‍ट्रिक व इलेक्‍ट्रॉनिक वस्तू ,चारचाकी लहान वाहने, यंत्रसामग्री, लक्‍झरी वस्तू, शीतपेये, सुकामेवा- ड्रायफ्रूट, सौंदर्यप्रसाधने, डिटर्जंट व साबण, कटलरी, क्रोकरी वस्तू, ताडी, नीरा, मिठाई, खाद्य व अखाद्य तेले, तेलबिया, मसाल्याचे पदार्थ, किराणा सामान, प्रक्रिया कलेले खाद्यपदार्थ, डिझेल यांचा समावेश असेल. 

स्वस्त
- एलईडी बल्ब  
एलईडी बल्बवरील कर 12.5 टक्क्यांवरून 5%  
- महिलांच्या हॅन्डबॅग 
- बेदाणे 
- आलेख वही, चित्रकला वही, 
- कंपास बॉक्स, 
- आराखडा वही स्वस्त होणार
- कर्करोगाच्या औषधे

महाग
- देशी मद्य 
- मसाले महाग होणार

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.