आता सिलेंडर घरपोच मिळणार नाही

येत्या एक ऑक्टोबरपासून सिलेंडरची घरपोच सेवा बंद करण्याचा इशारा सिलिंडर वितरकांच्या संघटनेने दिला आहे.

Updated: Sep 24, 2012, 05:37 PM IST

www.24taas.com, मुंबई
सवलतीच्या दरामध्ये दिला जाणारा सातवा गॅस सिलिंडर नेमक्या कोणत्या दराने ग्राहकांना द्यायचा, याबाबतच्या कोणत्याही स्पष्ट सुचना या महिन्याच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारने न दिल्यास येत्या एक ऑक्टोबरपासून सिलेंडरची घरपोच सेवा बंद करण्याचा इशारा सिलिंडर वितरकांच्या संघटनेने दिला आहे.
ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रताप दोशी यांनी ही माहिती दिलीये. याआधी सहा सिलिंडर सवलतीच्या दरात आणि त्यानंतरचे बाजारभावानुसार देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
पण याला विरोध झाल्यावर काँग्रेसशासित राज्यांनी ६ ऐवजी ९ सिलिंडर सवलतीत देणार असल्याची घोषणा केली होती. पण सातवा सिलिंडरच्या किंमतीबाबत अजुनही संभ्रमावस्था असल्याने वितरकांनी घरपोच सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुण्याच्या ग्राहकांना याचा फटका बसू शकतो.