पाहा म्हाडाच्या १०६३ घरांची सोडत सुरु

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई आणि कोकण क्षेत्रविकास मंडळातर्फे लॉटरीचे वेबकास्टींग माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 

Updated: May 31, 2015, 12:56 PM IST
पाहा म्हाडाच्या १०६३ घरांची सोडत सुरु title=

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई आणि कोकण क्षेत्रविकास मंडळातर्फे एकूण १०६३ सदनिकांसाठी वांद्रे इथल्या रंगशारदा इथं सोडत सुरू झालेली आहे. 

सकाळी १० वाजता -
म्हाडा घरांच्या संगणकीय सोडतीला सुरूवात
१०६३ घरांसाठी १ लाख २५ हजार ८४४ अर्ज
वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात सोडतीला सुरूवात

#म्हाडासोडत -३१० प्रतिक्षानगर सायनच्या पहिली सोडत, लक्ष्मण पवार यांना लागलं पहिलं घर - अनुसूचित जाती विभाग
zeenews.india.com/marathi

LIVE UPDATE : 
म्हाडाच्या १०६३ घरांची सोडत सुरु, प्रथमेश परब टाईमपासमधील दगडूला लागलं सायनला घर

संगणकीय पद्धतीने काढण्यात येणाऱ्या सोडतीचे थेट प्रक्षेपण http://mhada.ucast.in या वेबसाइट सकाळी १० वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत किंवा सोडत संपेपर्यंत वेबकास्टींग माध्यमातून करण्यात येणार आहे. 

या सुविधेमुळे घरबसल्या सोडतीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी मिळणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.