सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, १४ वर्षीय बलात्कार पीडितेच्या गर्भपाताला परवानगी

सुप्रीम कोर्टानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. एका नराधम डॉक्टरामुळं गर्भवती राहिलेल्या १४ वर्षीय मुलीच्या गर्भपाताला डॉक्टरांनी दिलेल्या मंजूरीनंतर कोर्टानं परवानगी दिलीय. 

Updated: Jul 30, 2015, 09:17 PM IST
सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, १४ वर्षीय बलात्कार पीडितेच्या गर्भपाताला परवानगी title=

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. एका नराधम डॉक्टरामुळं गर्भवती राहिलेल्या १४ वर्षीय मुलीच्या गर्भपाताला डॉक्टरांनी दिलेल्या मंजूरीनंतर कोर्टानं परवानगी दिलीय. 

सध्या २५ आठवड्यांची गर्भवती असलेल्या गुजरातमधील पीडित मुलीवर काही महिन्यांपूर्वी डॉ. जतीनभाई मेहता यानं बलात्कार केला होता. पीडित मुलगी टायफाई़डवरील उपचारांसाठी दवाखान्यात गेली होती. कालांतराने ती गर्भवती राहिली. तिनं कोर्टाकडे गर्भपातासाठी धाव घेतली. पण गुजरात हायकोर्टानं गर्भपाताला नकार दिला होता.

नंतर पीडित मुलीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टानं सुरुवातीला नकार दिला पण नंतर स्त्रीरोग तज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ अशा पाच जणांची समिती नेमून, जर समितीनं याला परवानगी दिली तर आम्हीही देऊ असं म्हटलं होतं.

 गर्भपातापूर्वी गर्भातील बाळाची डीएनए चाचणी करावी यामुळं बलात्कार प्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती येईल, असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले होते. या समितीनं मुलीची तपासणी केली. गर्भपातामुळं पीडित मुलीच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही, ती शारीरिक दृष्ट्या फिट असल्याचं या समितीनं म्हटलं होतं. या आधारे सुप्रीम कोर्टानं गर्भपातास परवानगी दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.