'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

मुंबई महापालिकेची रुग्णालयं डेंग्यूच्या विळख्यात अडकल्याचं आता समोर येतंय. सोमवारी, केईएममधल्या निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे या अवघ्या २३ वर्षांच्या डॉक्टरचा डेंग्यूनं बळी घेतलाय.

Updated: Oct 28, 2014, 10:41 AM IST
'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी title=

मुंबई : मुंबई महापालिकेची रुग्णालयं डेंग्यूच्या विळख्यात अडकल्याचं आता समोर येतंय. सोमवारी, केईएममधल्या निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे या अवघ्या २३ वर्षांच्या डॉक्टरचा डेंग्यूनं बळी घेतलाय.

डॉ. श्रुती ही मुंबईतील डेंग्युच्या सातव्या बळी ठरलीय. श्रुती अॅनेस्थेशियाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. २० ऑक्टोबर रोजी डेंग्यू झाल्यामुळं तिला केईएममध्ये दाखल करण्यात आलं. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं हिंदूजाला हलवण्यात आलं. मात्र, इथं तिची प्रकृती आणखीनच खालावत गेली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. 

डॉ. श्रुती यांच्या मृत्यूनंतर आता केईएममधल्या आणखी तिघा डॉक्टरांना डेंग्युची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. तसंच सायन हॉस्पिटलमधले दोन आणि कुपरमधल्या एका डॉक्टरलाही डेंग्यू झालाय. 

दुसरीकडे केईएमच्या आवारातच दोन ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचं आढळलंय. फवारणी झाल्याचा दावा हा केवळ कागदावरच राहिल्याचा आरोपही केला जातोय. 

मुंबईत यावर्षी सहाशेहून अधिक जणांना डेंग्यू झाला आहे. तर यामध्ये सात जणांचा मृत्यू झालाय. पावसाळा संपल्यानंतर डेंग्यू जास्त वेगाने पसरत असून आता थंडी पडू लागल्यानं याचं प्रमाण कमी होईल. असा विश्वास डॉक्टर व्यक्त करतायत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.