राज्याच्या मुख्य सचिवपदी जे. एस. सहारिया यांची नियुक्ती

राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी जे. एस. सहारिया यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया निवृत्त झालेत. बांठिया यांच्या जागी जे. एस. सहारिया यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 30, 2013, 09:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी जे. एस. सहारिया यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया निवृत्त झालेत. बांठिया यांच्या जागी जे. एस. सहारिया यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागलीय.
सहारिया हे १९७८च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. याआधी त्यांनी शिक्षण विभागाचे सचिव म्हणून कार्यभार पाहिलाय.
मावळते मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांना सेवामुदतवाढ देण्यात आलेली नाही. राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या स्पर्धेत ज्येष्ठ सनदी अधिकारी अमिताभ राजन यांचंही नाव चर्चेत होते. मात्र सेवाज्येष्ठतेमनुसार सहारिया यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.