मुंबई : जेजे रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरलाच स्वाईन फ्लू झाल्याचं समोर आलाय. मायक्रोबायोलॉजीच्या दुसर-या वर्षात असलेल्या डॉक्टर कनुप्रिया रोहिल्ला या निवासी डॉक्टरला स्वाईन फ्लू झाल्याचं समजतय.
14 ऑगस्टपासून डॉक्टर रोहिल्ला हिला तापाची लक्षणं दिसत होती. त्यातच मायक्रोबायोलॉजीच्या 4 निवासी डॉक्टरांवर टॅमी फ्लूची ट्रीटमेंट सुरु आहे.
गंभीर बाब म्हणजे हेच डॉक्टर स्वाईन फ्लूच्या सॅम्पल्सची तपासणी करतात. मात्र याच डॉक्टरांकडे स्वाईन फ्लूपासून बचावासाठी वापरण्यात येणारे एन 95 मास्कही उपलब्ध नाहीत.. या डॉक्टरांना या मास्क पुरवणं अत्यंत गरजेचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.