दुष्काळामुळं आव्हाडांची 'संघर्ष' दहीहंडी रद्द, आव्हाड नौटंकीबाज, शेलारांची टीका

जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष मंडळाची हंडी यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. दरवर्षी ठाण्यात संघर्षची दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. पण यंदा राज्यात अभूतपूर्व दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी आव्हाडांनी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Aug 20, 2015, 07:59 PM IST
दुष्काळामुळं आव्हाडांची 'संघर्ष' दहीहंडी रद्द, आव्हाड नौटंकीबाज, शेलारांची टीका title=

अमित जोशी, झी मीडिया,मुंबई: जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष मंडळाची हंडी यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. दरवर्षी ठाण्यात संघर्षची दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. पण यंदा राज्यात अभूतपूर्व दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी आव्हाडांनी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय.

दहीहंडी उत्सव यंदा साजरा न करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेवर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे. दुष्काळ काही आताचाच नाही. मात्र आव्हाड जाणीवपूर्वक याचं राजकारण करत असल्याचा आरोप, आशिष शेलार यांनी केला आहे. 

दरम्यान, दही आणि हंडी याचा काही संबंध नसलेल्या आशिष शेलारांनी मला अक्कल शिकवू नये, असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.