विमानतळ उडवण्याची धमकी; टॉयलेटमध्ये 'इसिस'चा संदेश

मुंबईतल्या 'डोमॅस्टिक एअरपोर्ट'ला धमकीचा इशारा मिळालाय. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना  'इसिस' या दहशतवादी संघटनेच्या नावे हा इशारा दिला गेलाय.

Updated: Jan 16, 2015, 10:30 PM IST
विमानतळ उडवण्याची धमकी; टॉयलेटमध्ये 'इसिस'चा संदेश  title=

मुंबई : मुंबईतल्या 'डोमॅस्टिक एअरपोर्ट'ला धमकीचा इशारा मिळालाय. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना  'इसिस' या दहशतवादी संघटनेच्या नावे हा इशारा दिला गेलाय.

येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच, २६ जानेवारी रोजी मुंबई आंतर्देशीय विमानतळ उडवून देण्याचा लिखीत इशारा देण्यात आलाय. आंतर्देशीय विमानतळातल्या 'ए वन टर्मिनल'मधल्या दोन्ही पुरुष शौचालयांत, गुरुवारी संध्याकाळी हा धमकीचा इशारा लिहिलेला आढळला. ISIS 26-01-15 IS BOM OK अशा स्वरुपाचा हा धमकीचा संदेश आहे.

विशेष म्हणजे, ६ जानेवारीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामधल्या शौचालयातही अशाच प्रकारचा धमकीवजा इशारा आढळला होता. त्यात दहा जानेवारीला विमानतळ उडवण्याची धमकी दिली गेली होती. तो धमकीचा संदेशही 'इसिस'च्या नावेच दिला गेला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.