www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा
कामगारमंत्री आणि बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काल राष्ट्रवादीच्या अपंगांच्या सेलचा जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवेनं शाई फेकल्यानंतर आज हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरमध्ये दुग्धाभिषेक घालण्यात आला. हसन मुश्रीफ यांनी झालेल्या प्रकाराबद्दल झी २४ तासकडे महाराष्ट्राची जाहीर माफी मागितलीय.
मुश्रीफ यांच्यावर काल राष्ट्रवादीच्या अपंगांच्या सेलचा जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवेनं शाई फेकल्यानंतर आज हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरमध्ये दुग्धाभिषेक घालण्यात आला. या हास्यास्पद प्रकराची झी २४ तासनं गंभीर दखल घेतली. झी २४ तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफांना खडसावल्यानंतर त्यांनी जनतेची जाहीर माफी मागितली.
पुरोगामी महाराष्ट्रात कोल्हापूरसारख्या शाहूंच्या भूमीत एक कामगारमंत्री जनतेच्या प्रक्षोभाची गंभीर दखल घेण्याचं सोडून थेट स्वत:चा दुग्धाभिषेक करून घेतो ही महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना आहे. दुग्धाभिषेकानं जर शुद्धीकरण होत असेल तर मग सिंचन आणि आदर्श घोटाळ्यात अडकेलेल्या मंत्र्यांनीही गोमुत्रानं स्वत:ची शुद्धी करून घ्यावी. म्हणजे राज्यातली गरिबी दूर होऊन सर्वच समस्या सुटतील. आज दूध महागल्यामुळं गरिबांच्या तोंडाचे दूध पळाले आहे. आणि मंत्रीमहोदय आपल्या शाईचे डाग धुण्यासाठी दुग्धाभिषेक करून घेत आहेत. हे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच संतापजनक प्रकार असल्याचं या घटनेतून समोर आलंय.
बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शाई फेकणा-या राष्ट्रवादीच्या अपंगांच्या सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवेची जिल्हाध्यक्ष पदावरून निलंबित करण्यात आलंय. अपंगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या नामदेव डोंगरदिवेनं हसन मुश्रीफ यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर त्याला पदावरून निलंबित करण्यात आलं.
कामगारमंत्री आणि बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काल राष्ट्रवादीच्या अपंगांच्या सेलचा जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवेनं शाई फेकल्यानंतर आज हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरमध्ये दुग्धाभिषेक घालण्यात आला. काल अपंगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या नामदेव डोंगरदिवेनं हसन मुश्रीफ यांच्यावर शाई फेकली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ