महागाईत वाढ, पेट्रोल-डिझेलनंतर भाजीपाला महागला

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भस्मासूर उभा रहिलाय. मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दणकून वाढ झालीय. भाजीपाला किंमतीत वाढ झालेय. भाज्यांचे दर ठाण्यात ८० ते १२० रुपयांच्या घरात पोहोचलेत

Updated: Jun 1, 2016, 03:57 PM IST
महागाईत वाढ, पेट्रोल-डिझेलनंतर भाजीपाला महागला title=

मुंबई : जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भस्मासूर उभा रहिलाय. मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दणकून वाढ झालीय. भाजीपाला किंमतीत वाढ झालेय. भाज्यांचे दर ठाण्यात ८० ते १२० रुपयांच्या घरात पोहोचलेत

डिझेलचे दर २ रुपये २६  पैसे तर पेट्रोल २ रुपये ५८ पैसे महाग झालंय. तर आवक घटल्यानं मुंबई, पुणे, नाशिक, नागपुरात भाज्यांचे भाव गगनाला भडकलेत. सरसकट सगळ्याच भाज्यांचे दर ठाण्यात ८० ते १२० रुपयांच्या घरात पोहोचलेत. 

तिकडे अरुण जेटलींना अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अर्धा टक्का कृषी कल्याण सेस आज पासून लागू होणार आहे. त्यामुळे आता सेवा कर १४.५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर गेलाय. म्हणजेच मोबाईल पासून रेल्वे तिकिटापर्यंत, डीटीएच सेवेपासून हॉटेलिंग, विमानप्रवास सारं काही महाग होणार आहे. अर्थात यामुळे सामन्यांच्या रोजच्या खर्चात एकदम मोठी वाढ होतेय.