शीना बोराच्या हत्येप्रकरणी दोषींवर आरोप निश्चित

हत्येचा कट रचण्याचा आरोप निश्चित

Updated: Jan 17, 2017, 04:00 PM IST
शीना बोराच्या हत्येप्रकरणी दोषींवर आरोप निश्चित title=

मुंबई : पोटची मुलगी शीना बोराच्या हत्ये प्रकरणी शिनाईची आई इंद्राणी मुखर्जी तिचा पती पीटर मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या तिघांवरही कलम 302 अंतर्गत शीना बोराची हत्या करणे, हत्येचा कट रचण्याचा आरोप निश्चित झाला आहे.

पीटर मुखर्जीवर खोटी कागदपत्र तयार करण्याचाही आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी ड्रायव्हर शामवर राय याला माफीचा साक्षीदार करण्यात आलंय. त्यामुळे त्याच्यावर कुठलाही आरोप नाही. येत्या 1 फेब्रुवारीपासून खटल्याच्या सुनावणीला सुरूवात होईल.