'इंद्राणीला शीनाचे आणि माझ्या मुलाचे संबंध पसंत नव्हते'

शीना बोरा हत्या प्रकरणात जितका धक्का इतरांना बसलाय त्याहूनही मोठा धक्का स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांना बसलाय. पत्नी इंद्राणी मुखर्जी हिनं पोलिसांसमोर केलेल्या खुलाशामुळे पीटर मुखर्जी अवाक झालेत.

Updated: Aug 26, 2015, 04:22 PM IST
'इंद्राणीला शीनाचे आणि माझ्या मुलाचे संबंध पसंत नव्हते' title=

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणात जितका धक्का इतरांना बसलाय त्याहूनही मोठा धक्का स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांना बसलाय. पत्नी इंद्राणी मुखर्जी हिनं पोलिसांसमोर केलेल्या खुलाशामुळे पीटर मुखर्जी अवाक झालेत.

शीना ही माझ्या पत्नीची इंद्राणी मुखर्जी हिची लहान बहिण आहे, असं मला गेल्या १५ वर्षांपासून माहीत आहे. मला याची यत्किंचतही कल्पना नव्हती की शीना इंद्राणीची बहिण नाही तर मुलगी आहे... मिखाईल बोरा हा भाऊ आणि शीना बोरा ही बहिण असल्याचं सांगतच माझी त्यांच्याशी ओळख करून देण्यात आली होती... आणि इंद्राणीनं जे सांगितलं त्यावर मी विश्वास ठेवला, असं वक्तव्य पीटर यांनी केलंय.

अधिक वाचा - शीना ही बहिण नाही तर मुलगी होती; इंद्राणीची धक्कादायक कबुली


शीना आणि पीटर यांचा मुलगा राहुल

मी इंद्राणीच्या आई-वडिलांना कधीच भेटलेलो नाही. शीनाचे माझ्या मुलाशी - राहुलशी संबंध होते... पण, तेव्हा मी या संबंधांना फार महत्त्व दिलं नव्हतं. मला आणि इंद्राणीला त्यांचे हे संबंध पसंत नव्हते. 

२०१२ नंतर शीना आमच्याकडे कधीच आली नाही. इंद्राणीनं ती शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्याचं म्हटलं होतं. 

हायप्रोफाईल हत्याकांड : बहिणीच्या हत्येसाठी इंद्राणी मुखर्जीला अटक 

माझ्या मुलानंही शीना ही इंद्राणीची मुलगी असल्याचं मला म्हटलं होतं... पण, तेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. 

प्रॉपर्टीचा वाद आहे किंवा नाही याबद्दलही मला काहीच कल्पना नाही. शीना आणि इंद्राणीमध्ये काही विवाद आहेत याचीही मला कल्पना नव्हती. 

रायगडमध्ये शीनाला जाळण्यात आलं होतं
२०१२ साली रायगडच्या जंगलात इंद्राणीनं आपला ड्रायव्हर श्याम राय यांच्यासोबत मिळून शीनाची हत्या केली होती. हे समजल्यानंतर पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांच्या हाती कोणतेही अवशेष लागलेले नाही. 

त्यानंतर पोलिसांनी रायगड पोलिसांशी संपर्क साधला असता २०१२ साली एका तरुणीचं प्रेत सापडल्याचं रायगड पोलिसांनी सांगितलं. पण, तेव्हा त्या प्रेताचा कोणताही थांगपत्ता न लागल्यानं पोलिसांनी हे प्रकरण अज्ञात म्हणून सोडून दिलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.