मुंबईतून एटीएम व्हॅनमधील १ कोटी रक्कम चोरणाऱ्या चालकास अटक

एटीएम व्हॅनमधील रक्कम घेऊन प्रसार झालेला व्हॅनचा चालक अमरदीप सिंग याला कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये अटक करण्यात आली. तो बिहारला जाण्याच्या तयारीत होता. आरोपी अमरदीप सिंग याला १ कोटी २५ लाख रूपयांसह अटक करण्यात आली आहे.

Updated: Mar 28, 2015, 12:36 PM IST
मुंबईतून एटीएम व्हॅनमधील १ कोटी रक्कम चोरणाऱ्या चालकास अटक title=

मुंबई : एटीएम व्हॅनमधील रक्कम घेऊन प्रसार झालेला व्हॅनचा चालक अमरदीप सिंग याला कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये अटक करण्यात आली. तो बिहारला जाण्याच्या तयारीत होता. आरोपी अमरदीप सिंग याला १ कोटी २५ लाख रूपयांसह अटक करण्यात आली आहे.

प्रॉपर्टी सेलने ही अटक केली. लुटलेल्या रक्कमेमधून २२ हजार रुपये खर्च केल्याची त्याने कबुली दिली. तो बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना कल्याण रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली.

मुंबईत चक्क एटीएम मशीन मध्ये पैसे भरण्याची गाडीच पळवून नेल्याची घटना घडली होती. यात तब्बल एक कोटी २५ लाख रुपये होते ही रक्कम ज्या गाडीतून आणली होती त्याच गाडीच्या चालकाने गाडीसह पळवली. माटुंग्याच्या खालसा कोलेज जवळ पोलिसांना ही रिकामी गाडी सापडली. सेन्ट्रल बँकेच्या ट्रॉम्बे येथील एका एटीएम मशीन मध्ये नगदी पैसे भरण्या साठी लॉजीकॅश या गाडीतून पैसे आणण्यात आले होते.

१६ लाख रुपये यात भरण्यासाठी बँकेचे कर्मचारी ४ कर्मचारी शुक्रवारी दुपारी एटीएम केंद्रात गेले. पैसे भरून बाहेर आल्यावर त्यांना चालकानं गाडी पळवल्याचं लक्षात आलं. या प्रकरणी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासासाठी पाच पथकं तैनात केली होती. तसेच सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली होती. दरम्यान, त्याच्या मित्राला फोन लावून पोलिसांनी चौकशी केली होती. तसेच कर्मचाऱ्यांनी त्यालाही फोन केला होता. मात्र, त्याने आपला फोन बंद ठेवला होता. त्यानंतर याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आणि तपासाची चक्रे फिरली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.