इमानचे २१ दिवसांत १०८ किलो वजन घटले!

लठ्ठपणावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या इमान अहमदचे गेल्या २१ दिवसांत तब्बल १०८ किलोनी वजन कमी झालेय.

Updated: Mar 9, 2017, 03:06 PM IST
इमानचे २१ दिवसांत १०८ किलो वजन घटले! title=

मुंबई : लठ्ठपणावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या इमान अहमदचे गेल्या २१ दिवसांत तब्बल १०८ किलोनी वजन कमी झालेय.

१३ फेब्रुवारीला इमानला मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता १२० किलो वजन घटल्यानंतर इमानचे वजन ३८० किलो झालेय. वजन कमी झाल्याने गेल्या २५ वर्षात इमान पहिल्यांदा स्वत: उठून बसू शकली. 

गेल्या २५ वर्षांपासून इमान अंथरुणावर झोपून होती. वजन वाढल्याने तिला हालचालीही करता येत नव्हत्या. तिला पूर्णपणे आई आणि बहिणीवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र आता वजन कमी होत असल्याने तिला काही हालचाली शक्य झाल्यात.