मुंबई : काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाची आज निवड होणार आहे, या स्पर्धेतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माघार घेतली आहे. मागील 15 वर्षात आपण काँग्रेस सरकारमध्ये अनेक पदं भूषवली.
आता आपल्याला मतदारसंघात कामं करायची आहेत, त्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. याबाबतीत आपण पक्षश्रेष्ठींना देखिल कळवलं असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस विधिमंडळपक्षनेते पदासाठी अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. यात तरूण चेहरा म्हणून अमित देशमुख यांचं देखिल नाव चर्चेत आहेत. राज्याचे माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचंही नाव स्पर्धेत असल्याचं सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.