शीना बोरा मर्डर मिस्ट्री: परी बोरा ते इंद्राणी मुखर्जी प्रवास

गुवाहाटीमध्ये वाढलेली परी नावाची साधी मुलगी मीडिया टायकून इंद्राणी मुखर्जी कशी बनली.. आपल्याच पोटच्या मुलीचा खून तिनं का केला... जाणून घ्या... 

Updated: Aug 27, 2015, 08:27 PM IST
शीना बोरा मर्डर मिस्ट्री: परी बोरा ते इंद्राणी मुखर्जी प्रवास title=

मुंबई: गुवाहाटीमध्ये वाढलेली परी नावाची साधी मुलगी मीडिया टायकून इंद्राणी मुखर्जी कशी बनली.. आपल्याच पोटच्या मुलीचा खून तिनं का केला... जाणून घ्या... 

गुवाहाटीची परी बोरा 

हत्या करणाऱ्या आईचं खरं नाव परी बोरा... गुवाहाटीच्या सुंदर नगरमध्ये ती लहानाची मोठी झाली. पण तिला आयुष्यात खूप मोठं व्हायचं होतं. त्यासाठी काहीही करायची तिची तयारी होती. १९८८ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षीच ती कुणालाही न सांगता घरातून निघून गेली. १९९० मध्ये दोन वर्षांनी ती घरी परतली, तेव्हा तिला दोन मुलं झाली होती... शीना आणि मिखाईल...

आणखी वाचा - नवा खुलासा : हत्येच्यावेळी प्रेग्नेंट होती शीना बोरा, मुलाला जन्म देण्याचे सांगितले होते इंद्राणीला

सिद्धार्थ दाससोबत पहिलं लग्न

कुणा सिद्धार्थ दास नावाच्या त्रिपुरातल्या माणसाबरोबर तिचं लग्न झालं. सिद्धार्थचे चहाचे मळे होते. मात्र शीना आणि मिखाईल ही आपली मुलं आहेत, हे मानायला दास तयार नव्हता. त्यामुळंच या दोन मुलांची आडनावं तिनं बोरा अशीच ठेवली. 

संजीव खन्नासोबत दुसरं लग्न

१९९०च्या सुमारास म्हणजे ती १८-१९ वर्षांची असताना संजीव खन्नाला भेटली. त्यांचं सूत जुळून आलं. मात्र तिनं पहिल्या लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल काहीच सांगितलं नाही. १९९३ मध्ये तिनं संजीव खन्नाशी लग्न केलं. मात्र काही वर्षांतच त्यांचंही बिनसलं.

आणखी वाचा - माझ्या बहिणीला इंद्राणी मुखर्जीने का मारलं मला माहितीय - मिखाईल बोरा 

पीटर मुखर्जीसोबत तिसरं लग्न

२००२ मध्ये इंद्राणीच्या गळाला मोठा मासा लागला. पीटर मुखर्जी... स्टार टीव्हीचे तेव्हाचे सीईओ... दोघंही घटस्फोटीत. मात्र पहिल्या काही भेटीनंतरच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यावेळी ती INX नावाची एचआर कन्सल्टन्सी फर्म चालवत होती. २००७ मध्ये इंद्राणी आणि पीटरनं 9X मीडिया ही स्वतःची नवी कंपनी जन्माला घातली. ती कंपनीची सीईओ बनली आणि पीटर मुखर्जी चेअरमन... २०१० मध्ये 9X मीडियाचा फुगा फुटला.

पुन्हा दुसऱ्या पतीच्या संपर्कात

२०१० नंतर इंद्राणीच्या रेशीमगाठी पुन्हा दुसरा पती संजीव खन्ना याच्याशी जुळू लागल्या. पीटर मुखर्जीला या नातेसंबंधांची कल्पना नव्हती. मात्र तिच्या मुलीला शीना बोराला हे माहित असावं. शीना आणि तिचा सावत्र भाऊ राहुल मुखर्जी यांचे प्रेमसंबंध इंद्राणीला रूचत नव्हते. तर आपल्या प्रेमसंबंधांना आडकाठी आणल्यास इंद्राणी आणि खन्नाचे संबंध उघड करू, अशी धमकी शीनानं दिली होती. हे संबंध उघड झाले असते तर इंद्राणीला आपला नवरा पीटर, त्याची संपत्ती, अगदी पोटगीवर देखील पाणी सोडावं लागलं असतं. म्हणूनच की काय, तिनं शीनाचा काटा काढला, अशी शक्यता वर्तवली जातेय.

पाहा व्हिडिओ -

-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.