wwwzee24taas.com, झी मिडीया, मुंबई
भारताच्या आण्विक ऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या बंगल्याचा लिलाव होणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार १९६६मध्ये डॉ. होमी जहांगीर भाभा यांचं निधन विमान अपघातात झाले. त्यानंतर त्या बंगल्यात त्यांचे छोटे भाऊ जमशेद भाभा राहायचे. मात्र २००७मध्ये ९३ वर्षीय जमशेद भाभा यांचं निधन झालं.
मुंबईतील मलबार हिलमध्ये हा बंगला असून, या बंगलासमोर हँगिंग गार्डन आहे. होमी भाभा यांच्या बंगल्याची किंमत २५७ कोटी रुपये असून, त्यापेक्षाही जास्त किंमतीला या बंगल्याचा लिलाव होण्याची शक्यता आहे.
बंगला १७,१५० चौरस फूट आहे. इमारतीचा तळमजला आणि तीन मजल्या व्यतिरिक्त बाग, गॅरेज आणि नोकरांची राहण्याची व्यवस्थासुद्धा आहे. तसंच गुंतवणूकदाराला १५मजले उच्च इमारत बांधण्याची अनुमती असेल. अर्थात ज्या इमारती होतील त्यांची किंमत खूप जास्त होईल.
जमशेद भाभा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात हा बंगला `नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आट्रर्स`ला (एनसीपीए) दान केलंय. तसंच बंगालमधील मौल्यवान पेंटिंग, शिल्पकले, दागिने आणि फर्निचर हेसुद्धा दान केलंय. एनसीपीए संस्था ही त्यांनी स्वता: बनवलीय आणि ही संस्था एक प्रिमियर संस्था आहे.
एनसीपीएनं बंगल्याच्या लिलावासाठी विकासक आणि इतर इच्छूक व्यक्तींच्या मागण्या मागवल्या आहेत. इच्छूक व्यक्तींना २.५ कोटी रुपये जमा करावे लागतील. तसंच लिलाव व्यतिरिक्त १० टक्के रक्कम जमा करावी लागेल. १७ जून ही अंतिम मुदत असून, लिलाव १८ जून रोजी उघडण्यात येतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.