५४ हजारांचं घर... स्वप्न आणि सत्य!

मुंबईत सामान्य माणसाचं घराचं स्वप्न हे शेवटी स्वप्नच राहिलं... पवईतल्या हिरानंदानीमधल्या घराचं स्वप्न आणि पवईच्या हिरानंदानीमधलं सत्य यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 6, 2014, 11:20 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत सामान्य माणसाचं घराचं स्वप्न हे शेवटी स्वप्नच राहिलं... पवईतल्या हिरानंदानीमधल्या घराचं स्वप्न आणि पवईच्या हिरानंदानीमधलं सत्य यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे.
पवईमध्ये तलावाच्या काठी वसलेलं हिरानंदानी गार्डन... कुणालाही प्रेमात पाडणारं... २५० एकरवरची दिमाखदार घरकुलं... एका बाजूला टेकडी आणि दुसऱ्या बाजूला तलाव अशी निसर्गाची जादूई साथ मिळालेला परिसर.... या सौंदर्यांमुळेच अनेक नामांकित कंपन्यांनीही त्यांची ऑफिसेस पवईमध्ये थाटली. सहाजिकच इथे घर असावं, असं स्वप्न कुणाही मुंबईकराला पडावं... ५४ हजार लांबच, पण झोपेतही सामान्यांना परवडू शकत नाहीत, इतकं हे स्वप्न महाग आहे.
हिरानंदानीमधल्या घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. खाजगी इमारतींमध्ये २० ते २५ हजार पर स्क्वेअर फूट इतका भाव आहे. तर विविध योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या सरकारी इमारतींमध्ये १८ ते २० हजार स्क़्वेअर फुटाचा दर आहे. बाजारभावाच्या भाषेत बोलायचं झालं तर  दीड ते दोन कोटींशिवाय पवईत घर मिळणं अशक्यच... इथे घर घ्यायचं म्हणजे ५४ हजार काय ५४ लाखही कमी पडतील... आणि पवईच्या हिरानंदानीमधलं घर शेवटी स्वप्नच राहिलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.