मुंबई : काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष आहे, असं सांगत मुंबई महापालिकेत काहीही झालं तरी काँग्रेससोबत युती करणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पण, आजवरचा भाजपा देशातील राजकारणातला इतिहास पाहिला तर 'विचारांशी मतभेद असलेल्या पक्षासोबत युती नाही' हा भाजपचा दावा फोल ठरतो.
१) उत्तर प्रदेशात तीन वेळा मायावती (निधर्मी)
२) बंगाल मधे व केंद्रात ममता बँनर्जी (निधर्मी)
३) केंद्रात जयललीता (निधर्मी)
४) आंध्र व केंद्रात चंद्राबाबु नायडू (निधर्मी)
५) कर्नाटकात कुमारस्वामी (निधर्मी)
६) बिहारमधे व केंद्रात नितिशकुमार (निधर्मी)
७) ओरिसात नविन पटनायक (निधर्मी)
८) आसामात प्रफुल्लकुमार मोहंतो (निधर्मी)
९) केंद्रात व काश्मिरमध्ये फारुक अब्दुल्ला (पाकवादी)
१०) जम्मू काश्मिर मेहबुबा मुफ्ती (अफजल गुरु समर्थक)
११) पंजाबमध्ये खलीस्तानवादी अकाली दलाबरोबर युती
१) कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस प्रणीत ताराराणी आघाडी आणि भाजपा एकत्र
२) ताराराणी आघाडी बरोबर भाजपाची युती
३) इस्लामपूर नगरपालिकेत भाजपा काँग्रेसबरोबर सत्तेत
४) वाळवा आणि शिराळा तालुक्यात zp च्या निवडणुकीत भाजपा आणी काँग्रेस युती आहे
५) नागपूर महानगरपालिकेत भाजपची बसपा व लीगशी युती आहे