www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या समुद्रात आजही हायटाईड येण्याची शक्यता आहे. दुपारी साडेबारा वाजता हायटाईडचा इशारा देण्यात आला आहे.काल दुपारी मुंबईच्या समुद्रात अचानक उंचच उंच लाटा उसळल्या होत्या.
काल उसलेल्या लाटांमुळे पाणी थेट नागरी वस्त्यांमध्ये शिरलं. शिवाजी पार्क आणि वरळी सी फेस परिसरात सगळीकडं पाणीच पाणी झालं होतं. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या नानौक नावाच्या चक्रीवादळामुळे अचानक या महाकाय लाटा उसळल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिलीय.
मुंबईत समुद्राचे आक्रमण पाहायला मिळाले. हे आक्रमण मुंबईकरांना एक धोक्याचा इशारा देऊन गेला. काल उसळलेल्या उंचच उंच लाटांनी मनुष्य किती समुद्र दूषित करतो याचंच प्रत्यंतर पाहायला मिळतेय. या लाटांसह प्लास्टिक, कचरा, बाटल्या, चपला असं बरंच काही पाहायला मिळाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.