पंकज भुजबळ यांना दिलासा, २५ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालाय.  

Updated: May 20, 2016, 07:23 PM IST
पंकज भुजबळ यांना दिलासा, २५ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश title=

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालाय. २५ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.

या निर्णयामुळे पंकज भुजबळ यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. पंकज भुजबळ यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी नकार दिला होता. नवीन महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात न्यायालयाने हा निकाल दिला होता. 

पंकज भुजबळ अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात आधी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागायला हवी होती, तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात आलात. आधी उच्च न्यायालयाला या प्रकरणी तपासणी करू द्या, नंतर आम्ही विचार करू. पंकज यांना याचिका मागे घेऊन उच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे पंकज भुजबळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी हा निर्णय न्यायालयाने दिला.