www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची ‘झेड’ सुरक्षा काढण्याबाबतची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलीय.
यावेळी मुकेश अंबानी यांना आलेल्या दहशतवाद्यांच्या धमकीमुळे विचारपूर्वक त्यांना सीआरपीएफ सुरक्षा देण्यात आल्याचं कोर्टानं नमूद केलं. तसंच ‘अंबानी नियमानुसार सुरक्षा यंत्रणेचं शुल्क भरत आहेत. त्यांना सुरक्षा द्यायची की बंद करायची’ असा सवालही कोर्टानं उपस्थित केला.
‘अंबानींना सुरक्षा देणं कधी बंद करायचं? याचा निर्णय शासन योग्य वेळी घेईल’ असंही कोर्टानं नमूद केलंय तसंच ही याचिका म्हणजे केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचं निरिक्षणही कोर्टानं नोंदवलंय.
सामाजिक कार्यकर्ते नितीन देशपांडे आणि विक्रांत कर्णिक यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. २१ एप्रिल रोजी सरकारनं अंबानींना झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.