अभिनेत्री आणि वकिलाचा मृतदेह पोत्यात सापडला

कांदिवलीत उच्चू भ्रू डहाणूकर वाडीत दुहेरी हत्याकांडामुळे खळबड उडाली आहे, एका नाल्यात पोत्यात दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. एका नाल्यात हे मृतदेह सापडले आहेत. 

Updated: Dec 13, 2015, 09:33 PM IST
अभिनेत्री आणि वकिलाचा मृतदेह पोत्यात सापडला title=

मुंबई : कांदिवलीत उच्चू भ्रू डहाणूकर वाडीत दुहेरी हत्याकांडामुळे खळबड उडाली आहे, एका नाल्यात पोत्यात दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. एका नाल्यात हे मृतदेह सापडले आहेत. 

अभिनेत्री हेमा उपाध्याय आणि हरिश बंबाणी हे आज हयात नाहीत, आज या दोन्ही जणांचे मृतदेह  असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे मृतदेह पाहून पोलिसांना आश्चर्य वाटले आहे, पिशव्य़ांमध्ये कोंबून हे मृतदेह नाल्यात फेकण्यात आले आहेत, हे मृतदेह बुडण्याइतकं पाणीही या नाल्यात नाही, किंवा कुठून बाहेरू वाहून आल्याची शक्यताही नाही, कारण या नाल्यात पाणीही तेवढंस नाही.

मृतांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आहेत. हरिश बंबाणी हे हेमा उपाध्याय यांचे वकील आहेत. याबाबतील खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्टमॉर्टमनंतर आणखी काही बाबी समोर येणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.