हॅलो, मी शेतकरी बोलतोय...मंत्र्यांना कॉलवर कॉल

हॅलो....मी शेतकरी बोलतोय....दुसरा कॉल कोल्हापुरातून, आमचा टोल कधी बंद करणार... तिसरा कॉल, हॅलो महागाई कमी कधी होणार....हा फोन खाली ठेवतोय तोपर्यंत पेट्रोल, डिझेल दर कमी होत असताना रिक्षा, बसचे भाडेवाढ का कमी होत नाही, आदी प्रश्नांनी मंत्री महोदय हैराण झाले आहे. कारण मंत्र्यांचे मोबाईल फोन व्हायरल झाल्याने सामान्यांना समस्या मांडण्यासाठी यायती संधी मिळाली.

Updated: Feb 3, 2015, 09:42 PM IST
हॅलो, मी शेतकरी बोलतोय...मंत्र्यांना कॉलवर कॉल title=

मुंबई : हॅलो....मी शेतकरी बोलतोय....दुसरा कॉल कोल्हापुरातून, आमचा टोल कधी बंद करणार... तिसरा कॉल, हॅलो महागाई कमी कधी होणार....हा फोन खाली ठेवतोय तोपर्यंत पेट्रोल, डिझेल दर कमी होत असताना रिक्षा, बसचे भाडेवाढ का कमी होत नाही, आदी प्रश्नांनी मंत्री महोदय हैराण झाले आहे. कारण मंत्र्यांचे मोबाईल फोन व्हायरल झाल्याने सामान्यांना समस्या मांडण्यासाठी यायती संधी मिळाली.

राज्य सरकारमधील काही मंत्री आणि त्यांचे पीए हे सध्या सातत्याने येणाऱ्या फोन कॉलपासून काहीसे वैतागले आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्रीमडलातील मंत्री आणि त्यांचे पीए यांच्या मोबाइल नंबरची यादी whats app च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यामुळे सर्वांचे नंबर हे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते. 

त्यामुळे सामान्य नागरिकांच्या विविध तक्रारी , मागण्या , निमंत्रणे, बैठकीसाठी वेळ मागणाऱ्यांचे फोन्स कॉल्स यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे काही मंत्र्यांनी मान्य केले. 

सरकार नवे असल्यानं आणि त्यामुळे अपेक्षा जास्त असल्याने फोन कॉल येत होतेच. मात्र गेल्या काही दिवसांत हे प्रमाण वाढल्याचं काही मंत्र्यांनी मान्य केलेय. काही क्षुल्लक कारणांसाठीही फोन येत असल्याचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.