मुंबई : मुंबईत मध्यरात्री आणि पहाटेपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दक्षिण मुंबईत आज सकाळी नऊपर्यंत पावसाच्या सरी सुरूच होत्या. पहाटे-पहाटे या अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं.
मात्र सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने, तसेच रविवारी वाहनांची फारशी वर्दळ रस्त्यावर नसल्याने पावसाची अडचण झाली नाही. दक्षिण मुंबईत पावसाचा जोर सर्वाधिक होता. सायनच्या प्रतिक्षानगर भागात काही ठिकाणी पाणी साचलं होतं, मात्र सर्वच ठिकाणी आता पाणी ओसरलं आहे.
दक्षिण मुंबईत लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा राजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती, गणेश भक्त देखील रांगेत असल्याने पावसात भिजले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.