कर्जमाफीबद्दल हायकोर्टाने सांगण्याची गरज नाही- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शेतकरी कर्जमाफीबद्दल थेट हायकोर्टाला कठोर शब्दात टिप्पणी दिली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 5, 2017, 12:35 PM IST
कर्जमाफीबद्दल हायकोर्टाने सांगण्याची गरज नाही- मुख्यमंत्री title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शेतकरी कर्जमाफीबद्दल थेट हायकोर्टाला कठोर शब्दात टिप्पणी दिली आहे. उत्तर प्रदेशच्या कर्जमाफी मॉडेलचा अभ्यास सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलंय. तसेच कर्जमाफी हा राज्याचा विषय आहे, यावर हायकोर्टाने सांगण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं आहे. 

नुकताच तामिळनाडूच्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालायने दिला आहे, या पार्श्वभूमीवर कर्जमाफीबद्दल हायकोर्टाने आम्हाला सांगण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तसेच  शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी देता येईल, याचा विचार सुरु असल्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचंही स्पष्ट केलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेची खिल्ली उडवली.