मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाची शिफारस, देशातला सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘भारतरत्न’साठी राज्य सरकार करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.
ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून खर्ची घातलं, म्हणून त्यांना भारत रत्न बहाल करण्यात यावा, तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या कार्याचा यथोचित गौरव करण्याचा सरकारचा मानस आहे.
ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला भारतरत्न सन्मान प्राप्त व्हावा, अशी राज्य सरकारची इच्छा आहे आणि त्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असं मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.