हार्बरची ठप्प झालेली सेवा पुन्हा सुरु

हार्बर रेल्वेमार्गावरील रेल्वे सेवा कोलमडली होती. ती पूर्ववत झालेय. शिवडी ते वडाळा दरम्यान रुळाला तडा गेल्याने वाहतूक बंद होती. त्यातच नव्या वेळापत्रकाचे धोरणही विस्कळीत झाले होते. त्यातच नवी भर पडल्याने प्रवाशांचे हाल झालेत.

Updated: Feb 4, 2016, 02:32 PM IST
हार्बरची ठप्प झालेली सेवा पुन्हा सुरु title=

मुंबई : हार्बर रेल्वेमार्गावरील रेल्वे सेवा कोलमडली होती. ती पूर्ववत झालेय. शिवडी ते वडाळा दरम्यान रुळाला तडा गेल्याने वाहतूक बंद होती. त्यातच नव्या वेळापत्रकाचे धोरणही विस्कळीत झाले होते. त्यातच नवी भर पडल्याने प्रवाशांचे हाल झालेत.

हार्बर रेल्वेमार्गावर सकाळी ऐनगर्दीच्या वेळी रुळाला तडा गेल्याने सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. वडाळा-शिवडी दरम्यान रेल्वेरुळाला तडा गेल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत असून, वडाळा, शिवडी, चुनाभट्टी या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याने कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस हा प्रवास मध्य रेल्वेच्या मार्गाने करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.