राज्यातील ९ टोलनाके कायमचे बंद

राज्यातील ९ टोलनाके बंद करण्यात आले आहेत. हे टोलनाके कोल्हापूर जिल्ह्यातील असून ते ३ फेब्रुवारीपासून कायमचे बंद करण्यात आलेत.

Updated: Feb 4, 2016, 02:10 PM IST
राज्यातील ९ टोलनाके कायमचे बंद title=

मुंबई : राज्यातील ९ टोलनाके बंद करण्यात आले आहेत. हे टोलनाके कोल्हापूर जिल्ह्यातील असून ते ३ फेब्रुवारीपासून कायमचे बंद करण्यात आलेत.

कोल्हापुरातले नऊ टोलनाके कायमस्वरुपी बंद होणार आहेत. राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. ३ फेब्रुवारीपासून हे टोलनाके बंद करण्यात आलेत. या सगळ्या टोलनाक्यांची मुदत संपली होती. त्यामुळे हे टोलनाके बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्रालयानं घेतला आहे.

कोल्हापुरातील टोल बंद करण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले होते. टोल बंदीचे लेखी आश्वासन देऊनही टोल वसूली सुरु असल्याने संतप्त शिवसैनिकांनी शिरोली आणि फुलेवाडी टोलनाक्यावर तोडफोड केली. तसेच कोल्हापूर बंदही करण्यात आले होते.  
 
तसेच फुलेवाडी येथील टोलनाका आंदोलकांकडून पेटवण्यात आला होता. तसेच मनसेही आंदोलन पुकारले होते. कोल्हापूरमधील टोल विरोधी आंदोलनाने हिंसक रुप धारण केले होते.  आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यांची मोडतोड केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नऊ टोल नाक्यांसह आयआरबीचे रुईकर कॉलनीतील ऑफिस, आयआरबी आर्यन हॉस्पिटॅलिटी व टेंबलाईवाडी कार्यालय अशा ठिकाणी परिसरात १०० मीटर परिसरात बंदी आदेश लागू केला होता. त्यामुळे नागरिक संतप्त होते.

हे टोल नाके बंद होणार

कळंबा, बार्शी, कोल्हापूर राधानगर, फुलेवाडी, रसनोबतवाडी, आर के नगर, शिये नाका, शिलोरी नाका, उचगाव नाका, शाहू नाका