हार्बर रेल्वे विस्कळीत, रूळाला तडे

हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. वाशी आणि मानखूर्द दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वेगाड्या वीस मिनिटे उशीराने धावत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 28, 2013, 10:42 AM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. वाशी आणि मानखूर्द दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वेगाड्या वीस मिनिटे उशीराने धावत आहे.
सीएसटीकडे येणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसत आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याचे लक्षात आले. सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील गाड्या धीम्या गतीने चालवण्यात येत आहेत. ऐन सकाळच्या वेळी ही घटना घडल्याने वाशीहून सीएसटीकडे येणाऱ्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.

अपमार्गाची वाहतूनक धीम्या गतीने तर डाऊन मार्गाची वाहतूक ठप्प पडली. त्यातच गाड्या उशीराने असल्याने अनेकांना बसचा प्रवास करणे पत्करले. कार्यलयनी वेळेत प्रवाशांचे मेगाहाल झालेत. मुंबईकडे येणाऱ्या नोकरदारवर्गांचे हाल झाले आहे. गर्दीतून प्रवास करण्याची वेळ पुन्हा एकदा हार्बर प्रवाशांवर आली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.