कामोठ्यात 30 गोण्यांत कोंबलेला गुटखा जप्त

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 30 गोण्यांत कोंबलेला अवैध गुटखा जप्त करण्यात आलाय. 

Updated: Oct 23, 2015, 05:59 PM IST
कामोठ्यात 30 गोण्यांत कोंबलेला गुटखा जप्त  title=

स्वाती नाईक, नवी मुंबई : पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 30 गोण्यांत कोंबलेला अवैध गुटखा जप्त करण्यात आलाय. 

गुरुवारी रात्री उशीरा कामोठे पोलिसांनी ही कारवाई केलीय. यावेळी, गुटख्यानं भरलेल्या 30 गोण्या जप्त करण्यात आल्या. या गुटख्याची अंदाजे किंमत 3 लाख असल्याचं सांगण्यात येतंय. शिवाय पोलिसांनी दोन स्विफ्ट गाड्याही जप्त केल्यात. कारवाईत एकूण सात लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. 

स्विफ्ट गाड्यांमध्ये गोण्यांत भरून अवैध गुटखा पुण्याहून मालाडला नेला जात होता. या प्रकाराची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानंतर तातडीनं हालचाल करत पोलिसांनी सायन-पनवेल मार्गावर सापळा रचला... आणि ही कारवाई केली. 

या प्रकरणी विजय उपाध्याय, विनोद देवरस्कर आणि महेंद्र रामदास आणि इतर दोन अशा एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.