झुंज संपली; गोविंद पानसरे यांचं मुंबईत उपचारादरम्यान निधन

अखेर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं निधन झालंय. मुंबईत उचारादरम्यान ब्रीच कॅन्डी हॉस्पीटलमध्ये पानसरे यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Updated: Feb 21, 2015, 08:23 AM IST
झुंज संपली; गोविंद पानसरे यांचं मुंबईत उपचारादरम्यान निधन  title=

मुंबई : अखेर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं निधन झालंय. मुंबईत उचारादरम्यान ब्रीच कॅन्डी हॉस्पीटलमध्ये पानसरे यांनी शुक्रवारी रात्री उशीरा 11 च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते 82 वर्षांचे होते.

मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान पानसरेंच्या फुस्फुसात रक्तस्राव झाला... तसंच त्यांना रक्ताची उलटीही झाली. त्यातच, पानसरेंची प्राणज्योत मालवली. शनिवारी सकाळी पानसरे यांचं पार्थिव कोल्हापूरला नेण्यात येणार असल्याचं समजतंय.

16 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांच्यावर अज्ञात इसमांनी समोरून पाच गोळ्या झाडल्या होत्या. या प्राणघातक हल्ल्यात गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे गंभीर जखमी झाले होते. 

गोविंद पानसरे यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूरच्या अॅस्टर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांना ते सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र, पुढील उपचार मुंबईतच करण्यात यावेत, असा सरकारनं पानसरे कुटुंबीयांसमोर प्रस्ताव ठेवला होता. स्वत: मुख्यमंत्र्यांनी पानसरे कुटुंबीयांची भेट घेतली होती. 

डॉक्टरांनीही पानसरेंना मुंबईला हलवण्यासाठी होकार दिल्यानंतर पानसरेंना एअर अँम्ब्युलन्सनं मुंबईच्या ब्रीच कॅन्डी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं होतं. पण, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.