'सेल्फी विथ स्टुडंट' निर्णयाला राज्य सरकारची तूर्तास स्थगिती

शाळाबाह्य मुलांसाठी घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी सेल्फी विथ स्टुडंट या निर्णयाला राज्य सरकारनं तूर्तास स्थगिती दिली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माहिती दिली आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर अंमलबजावणीत अडचणी असल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचं तावडेंनी म्हटलं आहे.

Updated: Jan 11, 2017, 01:23 PM IST
'सेल्फी विथ स्टुडंट' निर्णयाला राज्य सरकारची तूर्तास स्थगिती title=

मुंबई : शाळाबाह्य मुलांसाठी घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी सेल्फी विथ स्टुडंट या निर्णयाला राज्य सरकारनं तूर्तास स्थगिती दिली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माहिती दिली आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर अंमलबजावणीत अडचणी असल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचं तावडेंनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असतात. यावर तोडगा म्हणून बायोमेट्रीक हजेरी सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच शिक्षण विभागाने सेल्फी विथ स्टुंडची शक्कल लढवली होती. या निर्णयानुसार शिक्षकांना दर आठवड्याला मुलांबरोबर सेल्फी काढून तो 'सरल' या प्रणालीवर अपलोड करावा लागणार होता. शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नावर केंद्रीय शैक्षणिक सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार १८ टक्के मुले पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येत नाही असे निरीक्षण नोंदवले गेलं. त्यामुळं सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र तूर्तास सरकारनं या निर्णयाला स्थगिती दिली आहे. योग्य प्रशिक्षणानंतर हा निर्णय लागू करण्यात येईल असंही तावडे म्हणालेत.