गूगलवर 'Anti National' टाईप केल्यानंतर दिल्लीतील JNU टॉपवर

काही अडचण आली तर अनेक जण गूगलचा पर्याय निवडतात. आपल्याला हवा असणारा शब्द टाईप केल्यानंतर काही सेकंदात भराभर माहिती पुढे येते. आता 'Anti National' सर्च केल्यानंतर दिल्लीतील जेएनयू टॉपला येत आहे. त्यामुळे हा बदनामीचा डाव असल्याचे म्हटले जात आहे.

Updated: Mar 25, 2016, 01:51 PM IST
गूगलवर 'Anti National' टाईप केल्यानंतर दिल्लीतील JNU टॉपवर title=

मुंबई : काही अडचण आली तर अनेक जण गूगलचा पर्याय निवडतात. आपल्याला हवा असणारा शब्द टाईप केल्यानंतर काही सेकंदात भराभर माहिती पुढे येते. आता 'Anti National' सर्च केल्यानंतर दिल्लीतील जेएनयू टॉपला येत आहे. त्यामुळे हा बदनामीचा डाव असल्याचे म्हटले जात आहे.

एखादे ठिकाण किंवा माहिती मिळविण्यासाठी गूगलवर सर्च करणे हा झटपट पर्याय सगळेचण निवडतात. मात्र गुगल मॅपवर 'Anti National' टाईप करुन सर्च केलं असता दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ दाखवले जात आहे. गूगलकडून हे चुकून झाले आहे की हॅकरने केले आहे. ते स्पष्ट झालेले नाही. मात्र, नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
 
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ९ फेब्रुवारीला दहशतवादी अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. देशद्रोहाच्या आरोपाखाली जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला अटकदेखील झाली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे.