मुंबई : महिलांना त्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांद्वारे परत करण्यात आलेत. मुंबईतल्या माहुल मधील महिलांना उत्तम सिंग उर्फ़ राजू या सोनाराने चकाकी करुण देतो, असं सांगून सोन्याचे दागिने लंपास केले.
दोन दिवसावर नारळी पौर्णिमा असल्याने कोळी महिलांनी आपले दागिने राजूला दिले खरे, मात्र राजूने हे सोने घेवून आपल्या कुटुंबांसह पळ काढला. आपण फसवले गेलो आहे.
हे कळताच माहूल गावाच्या महिला अक्षरशहा शोकसागरात बुडाल्या, आयुष्याची कमाई लुटली गेली होती तेव्हा, या सर्व महिलांनी आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दिली पण उत्तम मल्ला उर्फ राजू चा शोध लागत नव्हता.
कालांतराने गुन्हे प्रकटीकरण शाखा सहा यांच्याकड़े समान तपास करण्याची कामगिरी सोपवली, त्यावर आरोपीचा माग करुन पश्चिम बंगाल येथून ४ किलो मुद्देमालासह अटक करुन या सोनारास आणले, ८७ पैकी ६७ महिलांचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने या कोळी महिलांना परत केले.
आपल्या कष्टाची कमाई केलेले दागिने परत मिळाल्याचे समाधान या महिलाच्या चेहऱ्यावर ठळक पणे दिसत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.