नोटांच्या बदल्यात सोनं घेऊन परदेशात पसार व्हायचं होतं, पण...

जुन्या नोटांच्या बदल्यात सोनं घेऊन देशाबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आलीय.

Updated: Nov 19, 2016, 01:36 PM IST
नोटांच्या बदल्यात सोनं घेऊन परदेशात पसार व्हायचं होतं, पण... title=

मुंबई : जुन्या नोटांच्या बदल्यात सोनं घेऊन देशाबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आलीय.

प्रणव चौहान असं या व्यक्तीचं नाव आहे. मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून सुमारे ६५ लाख रुपये किंमतीचं तब्बल अडीच किलो सोनं जप्त करण्यात आलंय. तस्करीचं सोनं घेऊन दुबईमार्गे कॅनडाला पळून जाण्याचा प्रणवचा बेत होता.

प्रणवच्या संशयास्पद हालचालीनंतर गुप्तचर विभागानं त्याच्या सामानाची तपासणी केली. त्यात तब्बल अडीच किलो सोनं त्यांना सापडलं. आपल्याकडे असणाऱ्या भारतातील चलनातून रद्द झालेल्या नोटांच्या बदल्यात प्रणवनं हे सोनं घेतल्याचं समोर येतंय.