वांद्र्यात रंगला तरुणीच्या आत्महत्या नाट्याचा थरार!

मुंबईतल्या वांद्रे भागात शुक्रवारी रात्री उशिरा नीतू धारिया या सतरा वर्षांच्या तरुणीनं आत्महत्या करण्याची धमकी देत साऱ्या परिसराला वेठीस धरलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 9, 2013, 09:14 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या वांद्रे भागात शुक्रवारी रात्री उशिरा नीतू धारिया या सतरा वर्षांच्या तरुणीनं आत्महत्या करण्याची धमकी देत साऱ्या परिसराला वेठीस धरलं.
वांद्रेमधल्या शासकीय वसाहतीमधल्या सिद्धीविनायक सोसायटीमध्ये नीतू राहते. काल संध्याकाळी सातच्या सुमारास ती कुणालाही न सांगता इमारतीच्या गच्चीवरच्या कठड्यावर चढली. घरच्यांबरोबर वाद झाल्यानं ती कठड्यावर पोहचली, अशी माहिती आहे. नीतू गच्चीवर गेल्याचं समजताच परिसरातले रहिवाशी इमारतीच्या खाली जमा झाले. तसंच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच मानसोपचार तज्ज्ञांनाही बोलवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी खबरदारीचा उपाय म्हणून इमारातीच्या खाली जाळी पसरवून ठेवली होती.

कुणाच्याही विनंतीला न जुमानता नीतूच्या कठड्यावर धोकादायक हलचाली सुरु होत्या. तब्बल पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर नीतूला गच्चीवरुन खाली उतरवण्यात यश आलं. त्यानंतर तिला पहिल्यांदा भाभा हॉस्पिटलमध्ये आणि नंतर खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.