मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर गीता कपूरच्या गाडीने एका तरुणाला धडक दिलीय, यात तरुण जखमी झालाय, गीता कपूर ड्राईव्ह करत असतांना हा अपघात झाला. मुंबईत काल रात्री वर्सोवा यारी रोडवर हा अपघात झाला.
सय्यद नावाचा युवक आपली बाईक पार्क करुन औषध आणायला जात होता, तेव्हा यारी रोड परिसरातील मोहन मेडीकलच्या समोर भरधाव वेगात येणाऱ्या गीता कपूरच्या गाडीने सय्यदला जोरदार धडक दिली. ज्यात सय्यदच्या दोनही पायांची हाडं फ्रॅक्चर झाली आहेत.
या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गीता कपूरची गाडी ताब्यात घेतलीय, तसेच चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान अपघाताच्यावेळी गीता कपूर कुठल्या नशेत होती की नाही याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. हा अपघात झाल्यानंतर जखमी सय्यदला ताबडतोड मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.