अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये १४ दिवसांची वाढ

अरुण गवळीला त्याच्या पॅरोलमध्ये १२ जुनपर्यंत वाढ मिळाली आहे. मुलाच्या लग्नासाठी गवळी पॅरोलवर बाहेर होता.

Updated: May 29, 2015, 07:00 PM IST
अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये १४ दिवसांची वाढ title=

मुंबई : सध्या पॅरोलवर तुरुंगाच्या बाहेर असलेल्या गुंड अरुण गवळीला आणखी दिलासा मिळालाय.

अरुण गवळीला पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ मिळालीय. मुलाच्या लग्नासाठी गवळीला पॅरोल मंजूर झाला होता. यानंतर, गवळीनं आईच्या आजारपणाचे कारण देत नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे ३० दिवसांच्या पॅरोलची मागणी केली होती.

मात्र, विभागीय आयुक्तांनी ३० ऐवजी १४ दिवसांची सुट्टी गवळीला मंजूर केलीय.

अरुण गवळी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकरांच्या हत्येप्रकरणी नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.