गणेश नाईक यांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून डच्चू

 राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याऐवजी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आलीय.

Updated: Jan 22, 2015, 10:27 AM IST
गणेश नाईक यांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून डच्चू title=

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याऐवजी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आलीय.

गणेश नाईक भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेली आहे. त्यामुळंच त्यांना कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं बोललं जातंय. 

नवी मुंबईवर गेली २७ वर्षे एकहाती वर्चस्व असलेले राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांना पुन्हा एकदा पक्षत्याग करण्याची चर्चा रंगली. मध्यंतरी एक गुप्त बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला विद्यमान आमदार संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते.

नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची कास सोडून भाजपाचा झेंडा हाती घेण्याची हालचाल सुरू केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने राजकीय खेळी करत नाईक यांनी राष्ट्रवादीला हादरा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

नाईक भाजपमध्ये जाण्याची चर्चा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकारणी बैठकीकडे केलेली पाठ यामुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच राष्ट्रवादीने त्यांना आता डावले गेल्याचे बोलले जात आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.