तुम्ही, तुमचं इन्कम टॅक्‍स रिटर्न भरले का?

तुम्ही, तुमचं इन्कम टॅक्‍स रिटर्न भरले का?, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०१५ आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना इन्कम टॅक्स भरणे बंधनकारक आहे. तसेच ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा व्यक्तींना देखील ऑडिट बंधनकारक आहे.

Updated: Aug 27, 2015, 04:20 PM IST
तुम्ही, तुमचं इन्कम टॅक्‍स रिटर्न भरले का? title=

मुंबई : तुम्ही, तुमचं इन्कम टॅक्‍स रिटर्न भरले का?, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०१५ आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना इन्कम टॅक्स भरणे बंधनकारक आहे. तसेच ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा व्यक्तींना देखील ऑडिट बंधनकारक आहे.

टॅक्‍स रिटर्न भरण्यासाठी काही महत्वाच्या महत्वाच्या सूचना
१) ऑडिट करून विवरणपत्र भरणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ सप्टेंबर आहे.

२) एक कोटींपेक्षा कमी करपात्र उत्पन्न  असणाऱ्यांना ऑडिट करण्याची गरज नाही.

३) नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी रिटर्न सोबत फॉर्म नं. 16 देणे आवश्‍यक आहे. संबंधित व्यक्तीला 'फॉर्म नं. 16' हा तो व्यक्ती काम करत असलेल्या संस्थेने, कंपनीने देणे बंधनकारक आहे.

४) काही संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार त्याच्या मासिक वेतनातून कर (टीडीएस) कापण्यात येतो. मात्र वर्षअखेर आगाऊ भरलेला कर अतिरिक्त झाल्यास प्राप्तिकर विभागाकडून तो परत मिळतो. 

प्राप्तिकर विवरणात करदात्याकडे असलेला प्राप्तिकर हा उणे (-) रकमेत दर्शविण्यात येतो. नंतर ही उणे रक्कम प्राप्तिकर विभागाकडून करदात्याला परत केली जाते. 

हा नियम व्यापारी, उद्योजकांना, संस्था आणि कंपन्यांनाही लागू आहे.

प्राप्तीकर रिटर्न भरतांना सोबत जोडावी लागणारी कागदपत्रे
बॅंकेचे स्टेट्मेंट : तुम्हाला वर्षभरात बॅंकेकडून किती व्याज मिळाले यासाठी १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंतचे आर्थिक वर्षाचे बॅंकेचे स्टेट्मेंट देणे आवश्यक आहे. 

तुमच्या बॅंकेतून तुम्हाला असे स्टेटमेंट मिळेल. वर्षभरात आपल्याला किती व्याज मिळाले याची माहिती विवरणपत्र भरताना देणे आवश्यक आहे.

कर्जाची कागदपत्रे : तुम्ही वर्षभरात विविध प्रकारची गुंतवणूक करतात. त्यामुळे तुम्ही केलेल्या काही गुंतवणुकीमुळे तुम्हाला प्राप्तिकरातून सूट मिळू शकते. जसे तुम्ही पीपीएफमध्ये भरलेली रक्कम, विम्याचा हप्ता, मुलामुलींची भरलेली फीच्या पावत्यांशिवाय तुम्ही गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा आणखी काही कर्जाचे स्टेटमेंट विवरणपत्र भरताना देणे आवश्यक आहे.

इतर महत्त्वाची कागदपत्रे : यात पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचा अकाउंट नंबर, बॅंक शाखा, बँकेचा आयएएफसी कोड इ. बॅंकेच्या अकाउंट नंबरमुळे प्राप्तिकर विभागाकडून येणारा रिफंड त्यात जमा होत असतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.