संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मादी बिबट्याचा मृत्यू

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'राधा' या मादी बिबट्याचा मृत्यू झालाय. 

Updated: May 21, 2017, 06:32 PM IST
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मादी बिबट्याचा मृत्यू title=

मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'राधा' या मादी बिबट्याचा मृत्यू झालाय. 

शनिवारी रात्री साडे अकरा वाजता वृद्धापकाळामुळे या मादी बिबट्याचा मृत्यू झाला. गेल्या १५ दिवसांपासून ही मादी बिबट्या आजारी होती. तिचे वय अंदाजे १८ वर्षे इतके होते 

2004 साली राधाला राधानगरी, कोल्हापूर येथून नॅशनल पार्कमध्ये  आणण्यात आलं होते. त्यावेळी तिचे वय अंदाजे 3 ते 4 वर्षं इतके होते. बिबट्या जन्मापासून साधारण 12 ते 14 वर्षे जगतात.