मुंबईतल्या सर्व महाविद्यालयांमध्ये शुल्क वाढ होणार

मुंबईतल्या सर्व महाविद्यालयांमध्ये शुल्क वाढ होणार आहे. मुंबई विद्यापीठात परीक्षा शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 19, 2017, 08:50 AM IST
मुंबईतल्या सर्व महाविद्यालयांमध्ये शुल्क वाढ होणार title=

मुंबई : मुंबईतल्या सर्व महाविद्यालयांमध्ये शुल्क वाढ होणार आहे. मुंबई विद्यापीठात परीक्षा शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आलाय. ६५० वरुन १२०० रुपये म्हणजे दुप्पट वाढ करण्यात आलीय. 

मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणा-या ७४० महाविद्यालयांमध्ये  फी वाढ होणारय. याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए. खान यांनी दिलीय.  

मुंबई, रायगड, रत्नागिरीच्या महाविद्यालयांचा समावेश यात करण्यात आलाय. येत्या शैक्षणिक वर्षापासून फी वाढ लागू कऱण्यात येणार आहे.  एकूणच परीक्षा घेण्याच्या खर्चात वाढ केल्याचा निर्णय़ घेण्यात आल्यानं याचा भूर्दंड विद्यार्थ्यांना बसणार आहे.