मुंबई : अभिनेता शाहरूख खानच्या दिलवाले चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या काही संघटनांच्या भूमिकेवर तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत न केल्याच्या मुद्यावर शाहरूख खानने अजूनही मौन बाळगलं आहे.
अभिनेता शाहरूख खानचा दिलवाले सिनेमा या शुक्रवारी रिलीज होत आहे. दिलवाले सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केलं असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी दुसरीकडे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची ही अधिकृत भूमिका नसल्याचं म्हटलं आहे.
दिलवालेवर बहिष्कार का?
दिलवाले सिनेमावर बहिष्कार टाकण्याचा मुद्दा चर्चेत येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे, शाहरूख खानने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मदत निधीत कोणतंही योगदान दिलं नाही, मात्र चेन्नई पूरग्रस्तांना मदत केली. चेन्नईत मदतीला कुणाचीही आठकाठी नाही, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडे शाहरूख खानने डोळेझाक का केली हा खरा प्रश्न आहे?