मुंबई : जुन्या हजार-पाचशेच्या नोटा चलनात बाद केल्यानंतर, काही शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्यांनी नोटा बदलवून देण्याचा तगादा लावला आहे. शेतकरी त्यांच्या अकाऊंटवर ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा भरतील, किंवा त्यांच्या नावाने बदलून देतील, असं काही व्यापाऱ्यांना वाटतंय.
मात्र शेतकऱ्यांनाही अकाऊंटवर पैसे टाकण्यास बदलण्यास मर्यादा आहेत, डिसेंबरपर्यंत अडीच लाखापेक्षा जास्त पैसे अकाऊंटला जमा झाले तर, त्याचा तपशील बँक आयकर विभागाला देणार आहे.
एका शेतकऱ्याच्या नावे किती शेती आहे, त्या क्षेत्रावरील उत्पन्नावर आधारीत मर्यादा टाकण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडे काळा पैसा नसतो ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा असली, तरी शेतकऱ्यांनी इतरांसाठी आयकर विभागाचा तगादा मागे न लावून घेतलेलाच बरा.