बोहल्यावर चढण्याआधीच आगीत तिची स्वप्न जळून खाक!

सायनमधील परमनगरमध्ये लागलेल्या आगीत शेकडो संसार उद्ध्वस्त झाले. जैसवार कुटुंबाला तर आता आपल्या मुलीचं लग्न कसं करावं? हा प्रश्न पडलाय. 

Updated: Dec 22, 2016, 07:01 PM IST
बोहल्यावर चढण्याआधीच आगीत तिची स्वप्न जळून खाक! title=

प्रशांत अंकुशराव, मुंबई : सायनमधील परमनगरमध्ये लागलेल्या आगीत शेकडो संसार उद्ध्वस्त झाले. जैसवार कुटुंबाला तर आता आपल्या मुलीचं लग्न कसं करावं? हा प्रश्न पडलाय. 

धारावीत लागलेल्या भीषण आगीत शंभरहून अधिक झोपड्या खाक झाल्या. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही... शेकडो संसार मात्र उद्ध्वस्त झाले. प्रेमनगरसारख्या झोपडपट्टीत राहूनही आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपडत असलेली चिमुकली आता मात्र शांत बसली आहेत. कारण त्यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी ना पुस्तकं शिल्लक राहिली आहेत ना लिहिण्यासाठी वह्या...

ज्या मीटर बॉक्सला आग लागली अगदी त्याच्या बाजूलाच यशोधरा जैसवार राहतात. आग लागल्यावर आपल्या मुलांसह आणि नवऱ्याबरोबर  जीव कसा-बसा वाचवला. मात्र, आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमा केलेली रक्कम आणि सोनं मात्र त्या वाचवू शकल्या नाहीत. आता मुलीचं लग्न कसं होणार? याची चिंता त्यांना सतावतेय. 

प्रेमनगरची वस्ती अधिकृत की, अनधिकृत हा प्रशासनाचा विषय आहे. अनधिकृत असल्यास एवढी मोठी झोपडपट्टी कशी वसते. हा प्रश्न असला तरी आज जे रहिवासी आहेत ते मदतीची अपेक्षा करतायत.